02/04/2024
6TH MEGA PLACEMENT DRIVE
For the students pass out/appearing in Diploma in Engineering, ITI, D. Pharm. and MBA On 08/04/2024 at 10:00 AM
Venue: At Adsul's Technical Campus, Chas Ahmednagar - 414005
Contact: 7020694792, 9970536943.
28/02/2024
Visit of ATC Civi departmenst students to the "Pre-Engineered Building" for Industrial Shed on 23-Feb-2024
23/02/2024
आडसूळ टेक्निकल कॅम्पसमध्ये संगणक विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस साजरा
चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पस मार्फत विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सोबतच महाविद्यालयांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासता विविध उपक्रम राबविले जातात . यातीलच एक भाग म्हणजे संगणक विभागातर्फे १३ फेब्रुवारी २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस साजरा करण्यात आला . या दिनाचे औचित्य साधून संगणक विभागातील सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता डॉ. हर्षदा बडे यांचे मौखिक आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजत करण्यात आले होते. या समारंभाचे अध्यक्षपद संस्थेचे संचालक मा. कृष्णा आडसूळ यांनी भूषविले. या प्रसंगी बोलताना डॉ. हर्षदा बडे यांनी आपल्या दाताचे आरोग्य कसे राखायचे, त्याची काळजी कशी घ्यायची , आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी सामील पाहिजेत याची सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थिनीच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. संचालक कृष्णा आडसूळ यांनी विद्यार्थिनींना व प्राध्यपिकाना असे आवाहन केले की, आपण आपल्या क्षेत्रात संशोधन करा, नवनवीन शोध लावा, पेटंट मिळवा. त्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्यासाठी संस्था सदैव तयार आहे.
या प्रसंगी संगणक विभाग प्रमुख डॉ. हेमंत जाधव, ई. अँड टी. सी. विभाग प्रमुख डॉ. दिनेश अडोकर आणि मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. स्नेहील गायकवाड उपस्थित होते. या उपक्रमासाठी संगणक विभागातील प्रा. योगिता सूर्यवंशी, प्रा. पूजा पालवे आणि प्रा. नेहा कर्डीले यांनी योगदान दिले.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ, सेक्रेटरी मा. लीनाताई आडसूळ, खजिनदार मा. श्री परमेश्वर आडसूळ, संचालक मा.कृष्णा आडसूळ, प्राचार्य व डायरेक्टर डॉ. प्रदीप एम. पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य मा. रमेश गडाख यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभागातील द्वितीय वर्षाच्या कु. विशाखा राठोड आणि चि. पुरुषोत्तम ठोंबरे यांनी केले
26/01/2024
विश्वात शोभुनी राहो..
भारत माझा...
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/01/2024
या मकर संक्रातीला पतंगाप्रमाणे यशाची उंच भरारी घ्या. भविष्य घडवा !
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !
09/09/2023
साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी व आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी.
चास, चास-निंबळक बायपास रोड, अहमदनगर
येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करीता बी. फार्मसी व डी फार्मसी प्रवेशा करीता
संस्थास्तरावरील व केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रीयेमधून रिक्त जागांकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :- ९३७१६७५५५५
05/09/2023
One book, One pen and one teacher can change the whole world.
Happy Teachers' Day!