Dr Bharat Kardak

Dr Bharat Kardak

Share

शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामीण विकास Dr Bharat Gangadhar Kardak
M.Sc.

Organic Chemistry, Ph.D.(UPV Spain), Post Doc Fellow (UOW, Australia)
Founder Director, Newasa Taluka Agro Producer Company Ltd
President, Sustainable Agriculture Development Trust, Newasa
Creator - FeelGud Natural Jaggery Brand

डॉ. भारत गंगाधर करडक
(एम. एस्स्सी. रसायनशास्त्र, पी.एच.डी.- स्पेन, पोस्ट डॉक्टरेट- ऑस्ट्रेलिया)(माजी प्रभारी प्राचार्य - प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे कला,वाणिज्य व विज्ञान मह

04/11/2025

से नो टू नेपो किड्स!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रस्थापित राजकीय कुटुंबातील सदस्यांची राजकीय सोय लावण्याची ही व्यवस्था नाही. "नव प्रस्थापित" नेतृत्व उभे करण्याची ही प्रयोगशाळा नाही! राजकीय गरीबी हटावचा हा कार्यक्रम नाही!

शिक पोरा शिक, तू लढायला शिक !
सर्व सामान्याच्या पोरा, तू लढायला शिक !!

से नो टू प्रस्थापित किड्स यांना!



#महाराष्ट्र #राजकीय #प्रबोधन #चळवळ
#स्थानिक #स्वराज्य #संस्था #निवडणूक
#प्रस्थापित #सर्वसामान्य #उमेदवारी

02/11/2025

भारतीय (बीसीसीआय) महिला क्रिकेट संघाच्या विश्वकप विजयाबद्दल सर्व खेळाडूंचे आणि सपोर्ट स्टाफ चे हार्दिक अभिनंदन!





#क्रिकेट #भारत #जगज्जेत्या #महिला #अभिनंदन

29/10/2025

तांडा चालला . . . . कोणी नाही पाहिला!

दिनांक एक नोव्हेंबर पासून उसाचा गळीत हंगाम सुरू होत आहे. दिवाळीच्या आधीपासूनच रस्त्यावर ऊस तोडणी कामगारांचे संसार ट्रक, ट्रॅक्टर, जीप, बैलगाड्यामध्ये भरून ऊस पट्ट्यामध्ये जाताना दिसायला लागलेली आहेत. दसऱ्यापासून कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत आणि दिवाळी झाल्यानंतर मोळीपूजन होऊन साखर कारखाने धडधडायला सुरुवात होणार आहे!

आमच्या लहानपणी, गावाकडे जेव्हा ऊसाला तोड यायची, तेव्हा असेच दहा ते बारा कुटुंब बैलगाड्या घेऊन आमच्या गावाकडे यायची आणि परिसरातील ऊस तुटेपर्यंत एका मोकळ्या जागेवर पालं टाकून राहायची. लहानपणी ही सगळी गंमत वाटायची. परंतु त्यांचे असे राहणे हे मोठे जिकरीचे होते. आजही तीच परिस्थिती आहे. त्यांच्या जीवनमानामध्ये किरकोळ बदल झाले तरी ऊस हंगामाचे 100 ते 150 दिवस हे मोकळ्या आकाशाखाली राहण्याचेच आहेत. त्यात अवकाळी पाऊस आणि कडाक्याची थंडी ही त्यांच्या पाचवीला पुजलेली आहे. ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून अनेकांनी आपले संसार सुखाचे करून घेतले परंतु ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना आणि विशेषतः मुलांना शाळा, शिक्षण, आरोग्य कोणीही देऊ शकले नाही. काही पथदर्शक प्रयोग नक्कीच झाले परंतु त्याचे "स्केल अप" होऊ शकले नाही.

मला पडलेला प्रश्न असा आहे की?,

साखर कारखाने एकाच ठिकाणी असतात. त्यांचा उसाचा परिसरही तोच असतो. दरवर्षी त्याच परिसरातील ऊस त्याच प्रकारची लोक तोडत असतात. त्यांच्या पालं टाकण्याच्या जागा देखील ठरलेल्या असतात. मग त्या साखर कारखान्याने त्या जागेवर सुविधा असणारी तात्पुरते निवारे बांधायला काय हरकत आहे? हेच निवारे हंगामाच्या काळामध्ये ऊस तोडणी मजूर वापरतील आणि बिगर हंगामी काळामध्ये कारखाने या जागेमध्ये शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी किंवा सहाय्यासाठी इतर उपक्रम राबवू शकतील. एक चांगल्या प्रकारचे बिजनेस मॉडेल तयार होऊ शकते. चांगल्या/थोड्या फंडिंग ची आवश्यकता आहे Sunil Khairnar जी, आपण कृपया यात मार्गदर्शन करावे, ही विनंती. रितेश उषाताई भाऊसाहेब पोपळघट

नेवासा तालुका ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने जेव्हा गुऱ्हाळ सुरू केले होते, तेव्हा आमच्या शेतकरी कुटुंबातील सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम निवारे या गुऱ्हाळ कामगारांसाठी बांधले आहेत. आजही ते सुस्थितीत वापरत आहेत. FeelGud - फीलगुड नैसर्गिक गूळ

सहकारी साखर कारखानदार आणि खाजगी साखर कारखानदारी या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील, अशी अपेक्षा!

२०२५/२६ या साखर हंगामासाठी शेतकऱ्यांना, कामगारांना आणि कारखानदारांना हार्दिक शुभेच्छा!

डॉ. भारत करडक
नेवासा, दिनांक २९/१०/२०२५

DrBharat Kakad Patil



#ऊस #साखर #हंगाम #ऊसतोडणी #मजूर #निवारा #सुविधा #स्टार्टअप

CMOMaharashtra
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar

Shekhar Gaikwad
Radhakrishna Vikhe Patil
Vitthalrao Langhe Patil

Bharatiya Kisan Sangh
Chandan Patil

https://www.facebook.com/share/1WHnUFNFs8/

View मावळा बोर्ड गेम's catalogue on WhatsApp 30/04/2025

🚩 *छत्रपती शिवाजी महाराज – मावळा स्वराज्यपट स्पर्धा!*

🎉 *उन्हाळी सुटी मध्ये घरीच खेळा, शिका आणि जिंका रुपये 1 लाखांचे भव्य बक्षीस!*

📅 *स्पर्धेचा कालावधी*: महाराष्ट्र दिन (1 मे 2025) ते हिंदू साम्राज्य दिन - शिवराज्याभिषेक दिन (6 जून 2025)

🛒 *स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:*

▪️दिनांक 1 मे 2025 (महाराष्ट्र दिन) ते 6 जून 2025 (हिंदू साम्राज्य दिन - शिवराज्याभिषेक दिन) दरम्यान *मावळा स्वराज्यपट* या खेळ प्रकारातील *व्हॉट्सॲप शॉप लिंक*: https://wa.me/c/919860943028 /फेसबुक लिंक वरून खरेदी केलेल्या ₹ 1999/- पेक्षा अधिक रकमेची वैध पावती हीच स्पर्धेची प्रवेशिका असेल.

▪️ हा खेळ - खेळून झाल्यावर, "या खेळातून तुम्ही काय शिकले?" या विषयावर जास्तीत जास्त 10 मिनिटांचा (एडिट न केलेला) व्हिडिओ तयार करा.
▪️ तो व्हिडिओ 9860943028 या नंबरवर आम्हाला पाठवा.
▪️ 15 ऑगस्ट 2025, स्वातंत्र्य दिनी विजेत्यांची घोषणा व बक्षीस वितरण होईल.
▪️ स्पर्धेबाबत अंतिम निर्णय आयोजकांकडे राखीव असेल.

🎲 *खेळांची माहिती:*

▪️मोठा बोर्ड गेम: शिवजन्म ते राज्याभिषेक – 1999/-
▪️लहान बोर्ड गेम: बालपण ते अफजल खानाचा वध – 999/-
▪️ इतर खेळ: ट्रंप कार्ड, पझल्स, कोडी इत्यादी (199 ते 999/-)
▪️ संपूर्ण संच: 6500/- (पोस्टेज फ्री!)

👧 *मुलांसाठी फायदे*:

▪️ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील राष्ट्रीय पारितोषिक विजेते दहा खेळ प्रकार.
▪️छत्रपतींची निर्णयक्षमता, बुद्धीचातुर्य आणि हजरजबाबीपणा अनुभवण्याची संधी.
▪️ छत्रपतींच्या इतिहासाची गोडी आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा.
▪️ शिकण्याची रंजक आणि अनुभवात्मक प्रक्रिया !

📞 *संपर्क*:

*व्हॉट्सॲप शॉप लिंक*: https://wa.me/c/919860943028

*व्हॉट्सॲप क्रमांक*:98609 43028

*फेसबुक* : https://www.facebook.com/share/15hyZY9cfC/

🔥 *"शिवछत्रपतींचा मावळा बनूया, स्वराज्य घडवूया!"*

_हा खेळ शाळा, महाविद्यालये, संस्था आणि कॉर्पोरेट भेट देण्यासाठीही उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब, शाळा आणि संस्थेमध्ये संग्रही असावा असा हा खेळ आहे._

📢 *आजच ऑर्डर करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा!*

जय महाराष्ट्र !



#छत्रपती #इतिहास #शिक्षण #खेळ
#स्वराज्य #मावळा #बोर्डगेम #स्पर्धा
#महाराष्ट्र #शिवराज्याभिषेक #विद्यार्थी #सुटी #शाळा #जनता #देश

View मावळा बोर्ड गेम's catalogue on WhatsApp Learn more about their products and services

18/04/2025

इतिहासाचे आकलन!

आपण महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेत असताना महाराष्ट्राचा इतिहास तुलनेने जास्त प्रमाणात वाचलेला आणि अनुभवलेला असतो.

परंतु केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई, आयसीएससी, आयबी, इ. बोर्डाच्या शाळांमध्ये मात्र महाराष्ट्राचा इतिहास हा दोन ते तीन पानांमध्ये शिकवला जातो. कारण त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना सर्व तीस राज्यांचा इतिहास थोडक्यात मांडायचा असतो.

महाराष्ट्रीयन पालक म्हणून आपल्या मनामध्ये अनेकदा ही खंत असते की आपल्या मुलांना महाराष्ट्राचा इतिहास आणि विशेषता छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास माहिती असलाच पाहिजे!

त्यासाठीच आम्ही गेली चार वर्षे अभ्यास करून विशेष पद्धतीने खेळांची निर्मिती केली आहे. दहा वेगवेगळ्या प्रकारच्या या खेळांमध्ये एकट्या मुलापासून ते पाच ते सहा सवंगड्यांना सोबत घेऊन खेळता येण्याची सोय आहे. त्यातून त्यांना महाराष्ट्राचा इतिहास तर माहिती होईलच परंतु संघभावना देखील वाढीस लागेल.

स्वराज्याच्या निर्मितीसाठी संघभावना ही अत्यंत महत्त्वाची आहे!

म्हणून आजच आपण स्वराज्य पट अर्थात मावळा बोर्ड गेम आणि त्यासोबतचे इतर खेळ ऑर्डर करा.

ऑर्डर साठी संपर्क: 098609 43028

तर आपल्या सवंगड्यांसह हे खेळ खेळायला तयार व्हा आणि आजच ऑर्डर करा!



#मावळा #स्वराज्यपट #बोर्डगेम #मराठी #इंग्रजी
#विद्यार्थी #शाळा #उन्हाळा #सुटी #शिकवणी #इतिहास #छत्रपती #शिवकालीन #व्यवस्था #ज्ञान #आचरण #पालक #शिक्षक #गुरुजी



09/10/2024

Tribute to The Legend ! Memories Forever !!

टाटायन . . . एक पर्व संपले!






Ratan Naval Tata

Photos from Dr Bharat Kardak's post 07/10/2024

Are you an Educator ?
Are you a Subject Expert ?
Are you a Teacher by Heart?

And

Do you want to share your expertise with The world?

Join us today by creating your profile by following simple steps @ www.provider.skillsetu.co

Sharing is Growth ! Growth is Life !!





Skillsetu
ONDC OnlineOpen Network For Digital Commerce (ONDC)

11/06/2024

गणवेश !

एक राज्य एक गणवेश योजनेचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. अर्थात योजना लागू झाली आहे.

त्यानुसार शासकीय शाळांच्या १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना एकच गणवेश शासनातर्फे दिला जाणार आहे.

यामध्ये, याठिकाणी, खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील हाच गणवेश लागू करण्यात यावा, अशी आग्रही मागणी मी करतो आहे.

त्यामुळे, सरकारी अन् खाजगी शाळा मधील विद्यार्थ्यांच्या मनातील एकमेकांबदल भेदाची भावना कमी होईल. गणवेशाचा नावाखाली व्यापारी तत्त्वावर होणाऱ्या नफेखोरीला आळा बसेल. खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक हानी कमी होईल.

दर्जेदार शिक्षण पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे. ती पूर्ण होत नसल्याने खाजगी शाळा ही व्यवस्था उभी राहिली.

शासनाने किमान विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश देवून शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे प्रयत्न करावेत.

याबद्दल, राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सन्माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातून लक्षावेधी / तारांकित प्रश्न विचारला जाईल. (सविस्तर प्रश्न आणि उत्तरासाठी इच्छुक आमदार महोदयांनी मला संपर्क करावा ;) )

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

डॉ भारत करडक
नेवासा



#गणवेश #शाळा #शासन #विद्यार्थी #विधानसभा #प्रश्न #तारांकित #लक्षवेधी #अधिवेशन #प्रश्नोत्तरे #एकराज्यएकगणवेष



Dr Bharat Kardak

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
CMOMaharashtra

Devendra Fadnavis Ajit Pawar

Deepak Vasant Kesarkar

Maharashtra DGIPR

PMO India

06/06/2024

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!

🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

🚩 Title- शिवराज्याभिषेक
🖌️ Medium- Acrylic colour on canvas
📏 Size- 8 feet × 4 feet
👉 Art by-



01/05/2024

सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दात ही जात मरहट्टयांची!

जय महाराष्ट्र!

#महाराष्ट्र

Want your school to be the top-listed School/college in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Ahmednagar
414001