15/06/2026
आज दिनांक १५ जून २०२६ रोजी कोंकण प्रांत कार्यकारिणी बैठक स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट चेंबूर येथे पार पडली. या बैठकीचे उद्घाटन प्रांत अध्यक्ष वैद्य कैलास सोनमनकर, मुंबई महानगर संघटन मंत्री श्री. अमित पटले व प्रांत मंत्री श्री. राहुल राजौरिआ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
13/06/2026
चेंबूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रांताच्या प्रांत अभ्यास वर्गासाठी सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यास चेंबूरकर सज्ज आहेत.
चेंबूर मध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन.
13/06/2026
चेंबूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रांताच्या प्रांत अभ्यास वर्गासाठी सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यास चेंबूरकर सज्ज आहेत.
चेंबूरमध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन!
🚩 विद्यार्थी शक्ती – राष्ट्र शक्ती 🚩
09/06/2026
जल, जंगल, जमीन आणि जनजातीय स्वाभिमानाच्या लढ्याचे महानायक, उलगुलानचे प्रणेते भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे राष्ट्रनिष्ठ, संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन आजही समाजाला स्वाभिमान, संघटन आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते.
08/06/2026
अभाविप कोंकण प्रांतातील नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने ऐतिहासिक सुधागड किल्ला, पाली येथे एकदिवसीय गडभ्रमण उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.
या उपक्रमातून गडावरील ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास, नैसर्गिक जलस्रोतांचा शोध तसेच मराठा युद्धनीतीतील महत्त्वाच्या ‘चोरवाटा’ समजून घेत विद्यार्थ्यांनी इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन घेतले.
गडाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान अधिक दृढ झाला.
यावेळी विद्यार्थ्यांनी अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र पाली येथील श्री बल्लाळेश्वर महागणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वादही प्राप्त केला.
07/06/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने रविवार, दि. ७ जून रोजी कुडाळ येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कुडाळ तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कुडाळ येथील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ तसेच अभाविपच्या पूर्व कार्यकर्त्या डॉ. हर्षदा देवधर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना परिश्रम, सातत्य, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर न थांबता समाजहिताची जाणीव ठेवून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
07/06/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांत आयोजित प्रांत अभ्यासवर्ग २०२६ साठी सज्ज!
📅 १५ ते १८ जून २०२६
📍 स्वामी विवेकानंद अभियांत्रिकी महाविद्यालय, चेंबूर, मुंबई
संघटन कौशल्य विकास, नेतृत्व प्रशिक्षण आणि राष्ट्रनिर्माणाच्या ध्येयाने प्रेरित कार्यकर्त्यांच्या या चार दिवसीय प्रांत अभ्यासवर्गात आपले हार्दिक स्वागत! 🚩
05/06/2026
अभाविप कोंकण प्रांत सदस्यता कार्यशाळा काल दि. ४ जून २०२६ रोजी अभाविप केंद्रीय कार्यालय माहीम-दादर येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या सत्रांतून कार्यकर्त्यांचे एकत्र व गटशः सदस्यता प्रशिक्षण करण्यात आले. सदस्यता अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन, संवाद कौशल्ये व संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. गीतेश चौहान, कोंकण प्रांत अध्यक्ष वैद्य. कैलास सोनमनकर, प्रांत मंत्री श्री. राहुल राजौरिआ, मुंबई महानगर संघटन मंत्री श्री. अमित पाटले व मुंबई महानगर मंत्री श्री. प्रशांत माळी उपस्थित होते.
31/05/2026
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन. ✨🙏🏻
समाजसेवा, सुशासन आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना कोटी कोटी प्रणाम.