18/06/2026
Maharashtra Education Society - MES
Today MES consists 75 schools and college.
Maharashtra Education Society (MES) is one of the oldest educational institute in India.Founded in 1860 by Indian revolutionary Vasudev Balwant Phadke;MES always walks path of empowering nation through EDUCATION.
18/06/2026
‘मएसो’च्या शाळांना गुणवत्ता संवर्धनाबद्दल पुरस्कार
पुणे, दि. २१ : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळा तपासणीमध्ये पुणे शहर स्तरावर इ. ५ वी ते १२ वी गटामध्ये म.ए.सो. मुलांचे विद्यालय (पेरुगेट भावे स्कूल) या शाळेला प्रथम आणि म. ए. सो. रेणुका स्वरुप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला पुणे शहर - औंध विभागात इ. ५ वी ते १२ वी गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याचप्रमाणे म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेला मुळशी तालुका स्तरावर इ. ५ वी ते १२ वी गटात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला पुणे जिल्हा स्तरावर इ. ५ वी ते १२ वी गटात तृतीय क्रमांक मिळाला आहे.
गुणवत्ता संवर्धन अभियानाचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळामध्ये शालेय स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तर या तीन टप्प्यांमध्ये गुणवत्ता संवर्धन शाळा तपासणी अभियान राबविण्यात येते. भौतिक सुविधा, प्रशासन विषयक, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मुख्याध्यापकांची कर्तव्ये, शालेय विभाग, गुणवत्ता संवर्धन व विशेष उपक्रम या सहा विभागांच्या अंतर्गत पाहणी करून गुण दिले जातात व अभिप्राय नोंदवण्यात येतो. हे अभियान शालेय विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
गुणवत्ता संवर्धन अभियानाचा प्रमुख उद्देश शालेय निरीक्षण व पर्यवेक्षणाद्वारे पारंपरिक व आधुनिक बाबींचा शालेय शिक्षण वाटचालीत समावेश व्हावा या दृष्टीने वर्तमान व आधुनिक निरीक्षण, तपासणीच्या पद्धतीचा समावेश करणे तसेच गुणवत्तेचे संवर्धन करण्यासाठी क्षमता वृद्धिंगत करणे, उणिवा दूर करणे, शिक्षक व शाळेचे कार्य यांचा परिचय करून देणे, शाळेच्या विकासासाठी आवश्यक घटकांचे पुनरावलोकन करून अद्ययावत राहणे, शाळांमधील उत्तम व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदान-प्रदान करणे हा आहे.
28/03/2026
‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनातून विस्तारते कल्पनांचे क्षितिज : डॉ. माधवी मेहेंदळे
“कला ही सर्वांना जोडते. मनातील भाव चित्रांच्या माध्यमातून प्रकट करता येतात, कल्पना स्वातंत्र्याला वाव मिळाल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ‘रंगवेध’सारख्या चित्रकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे क्षितिज विस्तारत असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण देखील होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी रेखाटलेली सामाजिक संदेश देणारी, पर्यावरण विषयक मांडणी असणारी चित्रे देखील या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळत आहेत. ‘मएसो’च्या शाळांमध्ये असलेली ‘मएसो कलावर्धिनी आर्ट वॉल’ चित्रकलेविषयी मोलाचे योगदान देत आहे,” असे मत ज्येष्ठ नेत्र शल्यविशारद व चित्रकार डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’ तर्फे आयोजित तीन दिवसीय ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाचे डॉ. मेहेंदळे यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६) करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते. संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
‘मएसो कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या महामात्र सौ. चित्रा नगरकर, कमांडंट एव्हीएन विंग कमांडर म. यज्ञरामन, पर्यवेक्षक व प्रदर्शनाचे समन्वयक संदीप पवार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कासारआंबोली येथे म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांपैकी निवडक चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला असते, एक शिल्प दडलेले असते. त्याला वाव देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून रंगवेध, स्वरवेध, तालवेध इ. उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ‘रंगवेध’च्या भव्य कलादालनात सुमारे ३०० निवडक चित्रांचे प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
सौ. आनंदी पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांना चालना देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकाने एक तरी कला जोपासली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ‘रंगवेध’ या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, ‘मएसो कलावर्धिनी’ चित्रकला विषयक नवनवीन कल्पना राबवून विद्यार्थ्याच्या चित्रांचे एक उच्च दर्जाचे कलादालन उभारते हीच एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहे. आपण पुन्हा एकदा चित्र काढायला शिकत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
‘मएसो कलावर्धिनी’चे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन तर चित्रकला शिक्षिका सौ. यशोदिनी कुलकर्णी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.
तीन दिवसांच्या या प्रदर्शनात सुलेखन, फेस पेंटिंग, शिल्पकला इत्यादी विषयावर विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. ‘रंगवेध’ दि. २९ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
26/03/2026
'यूईएफ' आयोजित 'यंग लिडर्स फोरम २०२६' मध्ये 'मएसो'चा यशस्वी सहभाग
व्हिएतनाममधील हो ची मीन सिटी युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड फायनान्स ('यूईएफ') मध्ये दि. १८ ते २० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'यंग लिडर्स फोरम २०२६' मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.
अनय कुलकर्णी, आयुष कुर्मी, साक्षी भोजने आणि कौशल सिंह या विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर चर्चेत असलेल्या सस्टेनेबिलिटी, सर्क्युलर इकॉनॉमी आणि उद्योजकता यासारख्या विषयांवर आपले संशोधन सादर केले.
या वेळी अनय कुलकर्णी या विद्यार्थ्याला 'बेस्ट पेपर अॅवॉर्ड' मिळाले. त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
शैक्षणिक सहभागाबरोबरच या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची ओळख असलेले ऊर्जादायी लेझीम नृत्य सादर करून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी दर्शन घडवले आणि जगभरातून आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली.
या दौऱ्यादरम्यान 'यूईएफ' सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक देवाण-घेवाण, संयुक्त संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
'यंग लिडर्स फोरम २०२६' च्या उत्कृष्ट आयोजन आणि भावपूर्ण आदरातिथ्याबद्दल 'यूईएफ'चे मनापासून आभार!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
1214-1215, Sadashiv Peth
Pune
411030