Jnana Prabodhini

Jnana Prabodhini

Share

Jnana Prabodhini- Official Page

21/06/2026
19/06/2026

महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३ साठीचा वसंतराव नाईक कृषिमित्र पुरस्कार लातूर विभागासाठी ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राला जाहीर झाला आहे.

Photos from Jnana Prabodhini's post 17/06/2026

Namaste,

We are pleased to share a brief 15-day activity update of Jnana Prabodhini’s initiatives across various states in India, highlighting educational programs, community engagement and volunteer-driven efforts. The report captures key activities and collaborations with local partners and organisations and appeal for fellowship program.

Key Highlights in Report:
1.Chhattisgarh
- Chhattisgarh Study Tour Begins with an Inspiring Interaction
- ⁠Screening of the Documentary – बस्तर : आनेवाला सवेरा

2.Arunachal Pradesh
- JPCEC – RIWATCH APPSC Program, Roing

3.Special Meets
- Assam, Nagaland, Jammu Kashmir

Regards,
Border and Aspirational States Initiative
Jnana Prabodhini

16/06/2026

ज्ञान प्रबोधिनी - सोलापूर

ज्वालातून उतरली चैतन्यभवनात फुले - मणिपुरी विद्यार्थ्यांचे आगमन

ज्ञान प्रबोधिनी, सोलापूरतर्फे मणिपूर येथील वनवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या सहनिवासातील २१ मुले उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी त्यांच्या घरी घेऊन जाण्याकरिता १९ एप्रिलला मी निघालो. पाच दिवसांचा प्रवास करून मुले घरोघरी २३ एप्रिलला पोहोचली.
अन् मृत्यू ओशाळला
भुवनेश्वरनंतरचा रेल्वे प्रवास म्हणजे जगण्याची शर्थच होती. खचाखच गर्दी, आरक्षण असूनसुद्धा सहा आसनांवर आम्ही १८ जण बसलो होतो. हालचाल करायला थोडीशीही जागा नव्हती. स्वच्छतागृहात जाणेसुद्धा शक्य नव्हते. डब्यामध्ये दुर्गंधी होती. रणरणत्या उन्हामुळे डबा प्रचंड तापला होता. उकाड्याने जीव कासावीस होत होता. हे सगळे सहन न होऊन आमच्या समोरच एक माणूस धाडकन खाली पडला. दोन-तीन वेळा आचके दिले. आजूबाजूच्या लोकांनी हातपाय चोळले. पण तो आमच्या समोरच गतप्राण झाला. मृत्यू ओशाळला म्हणजे काय हे प्रत्यक्षात पाहिलं. अशा भयावह स्थितीत आमचा प्रवास झाला.

ज्वालामय मणिपूर
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे तेथील परिस्थिती ही ज्वालामय बनली होती. सगळीकडे भयाचे वातावरण होते. इम्फाळपासून सर्व दिशांना जाणारे रस्ते बंद होते. त्यामुळे तेथे फिरणेच अवघड झाले म्हणून मी सोलापूरला परत आलो.

मणिपूर पोलिसांचा फोन?
सोलापूरला येऊन पोचतो न पोचतो तोच मणिपूर पोलिसांचा मला फोन आला. त्यांनी मला विचारले, “तुम्ही कोठे आहात?” मी सांगितले, “मी सोलापुरात आहे.” त्यावर त्यांनी म्हटले की, “इनर लाईन परमिट तुम्ही जाताना जमा का केले नाही? तुम्हाला येथील परिस्थिती माहीत नाही का?” मी त्यांची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही याची ग्वाही दिली.

अरे वेडा आहेस का ?
मुलांना आणण्यासाठी मी मणिपूरला येत आहे असे सांगण्यासाठी मी तेथील ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला. 'तू येऊ नकोस.' असाच सर्वांचा सूर होता. एक मित्र तर म्हणाला, ' वेडा आहेस का तू ?' परिस्थिती माहीत असून यायचं म्हणतोय.' पण मुलांना घेऊन यायचे हे पक्के ठरवले होते. त्यामुळे कुणाचेही न ऐकता मी २५ मे रोजी इम्फाळला पोहोचलो.

मित्रा, बंदूक घे
इम्फाळला पोहोचल्यानंतर नवीन मुले शोधण्यासाठी व मुलांना परत घेऊन जाण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. तामेंगलाँग, खरासोम, चुराचांदपूर व थोबल मुख्यतः या चार जिल्ह्यांतील मुले आपल्याकडे आहेत. परंतु या तिन्ही ठिकाणी जाण्यासाठी कोणतेही वाहन सुरू नव्हते. सर्वांशी दूरध्वनीवर संपर्क साधून नवीन मुलेही मिळवली आणि जाण्याची योजनाही केली.
या दरम्यान माझ्या संपर्कातील एक मित्र मणिपूरची एकूण परिस्थिती पाहता मला भेटायला आला व येताना एक बंदूक घेऊन आला. तो मला म्हणाला, “येथील परिस्थिती खूप बिकट आहे. संरक्षणासाठी ही बंदूक तुझ्याकडे ठेव.” बंदूक हातात घेताना मजा वाटली; परंतु मी त्याला म्हटले, “याची मला गरज नाही. *देव तारी त्याला कोण मारी.”

आम्ही नंतर येऊ
नवे-जुने विद्यार्थी घेऊन मी निघालो. पण ज्या ठिकाणी आपले संगणक प्रशिक्षण केंद्र चालते त्या खोपुम गावच्या समन्वयकाचा दूरध्वनी आला की आम्ही इम्फाळमध्ये पोहोचू शकणार नाही, कारण कोणतेही वाहन इम्फाळपर्यंत चालू नाही. त्यामुळे पुढील दिवसांत थोडीशी मोकळीक मिळाली की मी त्यांना नंतर घेऊन येईन. त्यामुळे दोन मुले येऊ शकली नाहीत.

दिव्य प्रवास
सोलापूरला येण्यासाठी चुराचांदपूरचे चार विद्यार्थी जंगलातून तीन दिवस ९१४ कि.मी. प्रवास करून दिमापूर येथे पोहोचले. तामेंगलाँग येथील पाच विद्यार्थी आडवाटेतून २२१ कि.मी. प्रवास करून दिमापूर येथे पोहोचले. खरासोमचे सात विद्यार्थी जीवमुठीत धरून १९७ कि.मी. प्रवास करून दिमापूर येथे पोहोचले.
मी चार विद्यार्थ्यांना घेऊन इम्फाळहून विमानाने गुवाहाटीला पोहोचलो. लुंगकाव (मणिपूरच्या राणी गायदिन्ल्यू यांचे गाव) येथील दोन विद्यार्थी, यांनी ४१६ कि.मी.चा दोन दिवसांचा प्रवास करून गुवाहाटी गाठले. सोलापूरहून आयुष हा युवक विमानाने गुवाहाटीला पोहोचला. मी त्या सहा मुलांना आयुषजवळ सोपवले आणि बाकीच्या मुलांना घेण्यासाठी गुवाहाटीहून दिमापूरला गेलो.
तेथील मुलांना घेऊन गाडीत बसलो. ती गाडी गुवाहाटीला पोहोचल्यावर आयुष सहा मुलांना घेऊन गाडीत आला. अशा प्रकारे आम्ही दोघे आणि २३ मणिपुरी मुले पुन्हा चार दिवसांचा प्रवास करून दिनांक १४ जून रोजी रात्री सोलापुरात यशस्वीरित्या पोहोचलो.

फुले सुगंधित होतील
अशा ज्वालामय परिस्थितीत राहणारी ही मुले या चैतन्यभवनात आपली गुणसुमने विकसित करून सुगंधित होतील, अशी आशा आहे.

अनंत अल्लिशे
राष्ट्रीय एकात्मता विभाग प्रमुख

#मणिपूर #सहनिवास #ज्ञानप्रबोधिनी #सोलापूर

Photos from Jnana Prabodhini's post 15/06/2026

श्रमिकांच्या श्रमकार्याचे मोल... अनमोल! -------------------------------------
दुष्काळी तालुका म्हणून वर्षानुवर्षांची ओळख असणारा करमाळा हा सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका. त्यातील रावगावातील बहुतांश मातंग समाज असलेली लहुजीवस्ती ही पाणीटंचाईशी झुंजणारी १५० लोकसंख्येची वस्ती.
१० किलोमीटरवरील शासकीय विहिरीवरून गावात ग्रामपंचायतीने पाणी आणले पण साठवणूक व्यवस्था नाही म्हणून भेडसावणारी पाणीटंचाई. वस्तीच्या मागणीवरून ज्ञान प्रबोधिनीने गावात नुकतीच १५ हजार लिटर क्षमतेची टाकी बांधली. यासाठी दिवसभर मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांनी रात्री जागून टाकीचा सांगाडा उभारण्यासाठी श्रमकार्य केले. काल रात्री पावणे तीन पर्यंत जागून प्लास्टरकाम केले व टाकी पूर्ण केली.
या श्रमकार्याचे मोल अनमोल आहे...! 🙏🏻🚩

#ज्ञानप्रबोधिनी

13/06/2026

Jnana Prabodhini cordially invites you for the _screening of the Documentary film_ बस्तर : आनेवाला सवेरा

On the backdrop of armed Naxal conflict coming to an end recently, Jnana Prabodhini media center's team extensively interviewed various stakeholders in Bastar, including government officials, surrendered Naxals, NGOs, local tribals etc. and presents the cumulative learnings through this documentary.

🗓️ Date : 14th June 2026, Sunday
⏰Time : 10 AM to 12 PM
Venue : Prabodh Sabhagruha, Jnana Prabodhini

Photos from Jnana Prabodhini's post 13/06/2026

फनेपूर येथे जलतारा प्रकल्पांतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम...
हवामान बदलामुळे पर्जन्यमानात ही फरक पडत आहे. कमी वेळेमध्ये अधिक पाऊस, दोन पाऊसाच्या मधील अंतर आदी बदल दिसत आहेत. विशेषतः धाराशिव जिल्ह्यात एकीकडे पूरग्रस्त स्थिती आणि काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून निर्माण होत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता धाराशिव जिल्ह्यात प्राज फाउंडेशन यांच्या आर्थिक साह्यातून ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळी यांच्या माध्यमातून जलतारा प्रकल्प राबवत आहेत. लोकसहभागाच्या बळावर आज अखेर ३ हजार पेक्षा जास्त जलतारा खड्डे घेण्यात आले आहेत. लोहारा तालुक्यातील वडगाव वाडी, वडगाव गांजा, फनेपूर, पांढरी, सय्यद हिप्परगा, करवंजी, तोरंबा आणि धाराशिव तालुक्यातील भंडारवाडी या गावात हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात आला. यानिमित्ताने फनेपूर येथे शेतकरी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जलतारा प्रकल्पाचे राज्य समन्वयक पुरुषोत्तम वायाळ सर यांच्या प्रमुख उपस्थितीत फलक अनावरण, जल पूजन व मातृभूमी पूजन करण्यात आले. पहिल्या पाऊसात जलतारा खड्ड्यातून विहिरीत आलेल्या तिन्ही गावातील पाण्याचे एकत्रित जलपूजन करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात ज्ञान प्रबोधिनी चे पद्य घेवून, एकूण झालेल्या कामाचा आढावा देवून त्या त्या गावातील जलदूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी देवकते साहेब, BDO गायकवाड साहेब, प्राज फाऊंडेशन चे सुरेश दादा रेणुसे यांनी मार्गदर्शन केले. तीन गावातील जलदूत यांना पर्जन्यमापक यंत्र देण्यात आले. त्यानंतर पुरुषोत्तम वायाळ सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग वाढत असल्याने आनंद व्यक्त केले. तसेच जलतारा खड्डे घेतल्यामुळे भूजल पातळीत वाढ, जमिनीचा वापसा लवकर येईल त्यामुळे पिकं टिकतील, जमिनीत ओलावा टिकून राहील असे अनेक फायदे त्यांनी सांगितले. तसेच प्राज फाउंडेशन व ज्ञान प्रबोधिनी यांचे ही अभिनंदन आणि कौतुक वायाळ सर यांनी केले. त्यानंतर आमदार प्रवीण स्वामी सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. समारोप व आभार ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळी चे केंद्र प्रमुख अभिजित दादा कापरे यांनी मांडले. शेवटी राष्ट्रगीत घेवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी वाडी वडगाव, वडगाव गांजा, फनेपूर आणि भंडारवाडी येथील १३७ शेतकरी उपस्थित होते. तसेच या गावातील लोकप्रतिनिधी, गावातील जलदूत आणि ज्ञान प्रबोधिनी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

#हराळी #ज्ञानप्रबोधिनी

10/06/2026

#संभवामि युगे युगे
#ज्ञानप्रबोधिनी पालक संघ अभिव्यक्ती गट
पुण्यात एप्रिल महिन्यात झालेल्या सादरीकरणानंतर खास निमंत्रणावरून पुढचे २ प्रयोग घेऊन येत आहोत, सोलापूर (१४ जून) आणि सासवड (२१ जून) येथे.

आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण🙏🏻 सोलापूर आणि सासवड भागातील आपल्या ओळखीतील, परिवारातील सर्वांना ही माहिती जरूर पोचवावी ही विनंती!!

*संभवामि युगे युगे*
गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्रकला, शिल्पकला अशा विविध अभिव्यक्तींचा रंगमंचीय कलाविष्कार!!

🔊 🎵🎤🎸🎭🎨🎨🎹🎙️

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Jnana Prabodhini , 510, Sadashiv Peth
Pune