19/06/2026
आज संगमनेर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित विवाह सोहळ्यांना उपस्थित राहून नवदांपत्यांना त्यांच्या नव्या आयुष्याच्या सुखद, समृद्ध आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Maithili Tambe, School, Sr. No. 31 , Aundh-Ravet BRT Road, Dange Chowk, Pune.
19/06/2026
आज संगमनेर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित विवाह सोहळ्यांना उपस्थित राहून नवदांपत्यांना त्यांच्या नव्या आयुष्याच्या सुखद, समृद्ध आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐
19/06/2026
एखाद्या शहराचा इतिहास केवळ इमारतींमध्ये किंवा कागदोपत्री नोंदींमध्ये जिवंत नसतो; तो जपला जातो संशोधनातून, अभ्यासातून आणि त्या इतिहासाला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्यासातून.
याच ध्यासातून संगमनेरचे सुपुत्र श्री. गणेश त्रिंबक राजदेव यांनी "संगमनेर नगरपालिका : ऐतिहासिक अभ्यास (१८६० ते २०११)" या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त करून संगमनेरच्या इतिहासाला शैक्षणिक अभ्यासाची नवी दिशा दिली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल आज संगमनेर येथील प्रभा निवासस्थानी त्यांचा सत्कार करून पुढील संशोधन वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या मातीचा इतिहास जतन करण्याचे हे कार्य अनेक तरुण संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
17/06/2026
भाजी विक्रेत्यांना सन्मानाने हक्काची जागा!
संगमनेर नगरपालिकेने उभारलेल्या अधिकृत भाजी मार्केटमध्ये शहरातील भाजी विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोजगार आणि उपजीविकेची सुरक्षितता जपत, काल नगरपरिषदेच्या सभागृहात या भाजी विक्रेत्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
हे ओळखपत्र केवळ एक कार्ड नाही, तर शहराच्या अर्थचक्राला हातभार लावणाऱ्या कष्टकरी भाजी विक्रेत्यांच्या अस्तित्वाला आणि योगदानाला मिळालेली अधिकृत मान्यता आहे.
संगमनेरच्या विकासात प्रत्येक घटकाचा सन्मान राखत, सर्वसमावेशक आणि माणुसकी जपणारे निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न कायम राहील.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी निवासिनी देवीचे माझ्या आई सोबत मनोभावे दर्शन घेतले.
देवीची आरती करून सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. देवीचा कृपाशीर्वाद सदैव सर्वांवर राहो, हीच प्रार्थना.
📍 श्री सप्तशृंगी गड, श्री सप्तशृंगी निवासिनी देवी शक्तीपीठ, वणी, जि. नाशिक
13/06/2026
गुंजाळवाडी येथे सुरू असलेल्याविश्व गौरव विभूषित महायोगी प. पू. श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहास लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब व आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह उपस्थित राहिले.
यावेळी रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण निरूपण ऐकण्याची संधी मिळाली. रामायणातील विविध प्रसंगांचा आजच्या समाजजीवनाशी संबंध जोडत त्यांनी मांडलेले विचार अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते.
आपल्या संस्कृतीतील मूल्ये आणि परंपरा जपत समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य अशा उपक्रमांमधून घडते. भविष्यातही अशाच धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी नाते अधिक दृढ करत संवाद साधण्याची संधी मिळत राहो, हीच प्रार्थना.
Satyajeet Tambe