17/06/2026
*न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या एन सी सी कॅडेट्सचे घवघवीत यश*
यावर्षीचा कम्बाईन अन्युअल ट्रेनिंग कॅम्प CATC706 बारामती सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक 25 मे ते 3 जून 2026 या कालावधीत पार पडला. थ्री महाराष्ट्र आर्मड स्कॉर्डन एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल व्ही ए एस जोहर (सेना मेडल ) यांच्या नेतृत्वाखाली या कॅम्पचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 19 शाळा तसेच विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कॅम्पमध्ये आर्मीशी संबंधित ड्रिल,फायरिंग, जेजुरीकडीद पठार येथे ट्रेकिंग, गार्ड ऑफ ऑनर, सायबर सेक्युरिटी,एन्ट्री इन डिफेन्स सर्विसेस, फायर फायटिंग, फर्स्ट एड, ए आय फार्मिंग साईड व्हिजिट, अशा मिलिटरी संबंधित विविध प्रकारच्या विषयांचे ट्रेनिंग कॅडेट्सना देण्यात आले. या शिबिरामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेतील 49 विद्यार्थी व एन सी सी चीफ ऑफिसर राजेंद्र पवार यांनी सहभाग घेऊन *ड्रिल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक, चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक, सांघिक गीत गायन द्वितीय क्रमांक, बेस्ट मोटिवेशनल ड्रामामध्ये प्रथम क्रमांक, बेस्ट कॅडेट तृतीय क्रमांक,बेस्ट फायरर तृतीय क्रमांक अशी एकूण 48 पदके प्रशालेने प्राप्त केली. याबद्दल एकूणातील विजेतेपद म्हणजेच या कॅम्पची ओव्हर ऑल चॅम्पियनशिप प्राप्त केली व ट्रेनिंग ऑफिसर म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल चीफ ऑफिसर राजेंद्र पवार यांचा आर्मी कॅप देऊन सत्कार करण्यात आला.* या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर, मुख्याध्यापक आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी , पर्यवेक्षक अंजली गोरे , मंजुषा शेलूकर यांनी मार्गदर्शन केले आणि प्रोत्साहन दिले.
17/06/2026
*रमणबाग प्रशालेत इयत्ता पाचवीचा शाला प्रवेशोत्सव*
सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभी इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी 'शाला प्रवेशोत्सवाचे ' आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचे प्रवेशद्वार रांगोळ्यांनी सजवले. बालकांच्या आवडत्या मिकी माऊस आणि डोनाल्ड डक या कार्टून्सनी तसेच NCC च्या विद्यार्थ्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांनी या गीतासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापक आशा माने यांनी पर्यावरण रक्षण या मूल्याचा वारसा जपणारी बोधकथा सांगितली.
प्रशालेचे माजी शालासमिती अध्यक्ष तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद अगरखेडकर यांच्या हस्ते पाटीपूजन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात काही नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे संच देण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी सुलेखन पुस्तिका आणि पेढा देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी पाहुण्यांनी शाळेची गुणवत्ता आणि मूल्यांचा वारसा कायम राखण्याचा आशीर्वाद विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांची ओळख करुन देण्यात आली. उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी शाळेच्या विविध विभागांची माहिती सांगितली. यावेळी कार्टून्स म्हणून स्वागत करणाऱ्या प्रत्युष महामुनी आणि ओम बोरकर या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. नाट्यकर्मी रवींद्र सातपुते यांची ही कल्पना होती.
कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक मंजुषा शेलुकर यांनी मानले. प्रशालेच्या प्रवेशद्वाराजवळ चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे यांनी अतिशय सुंदर सेल्फी पॉईंट तयार केला, जिथे नवागत विद्यार्थ्यांनी फोटो काढला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या
'एक पेड मा माँ के नाम ' या पर्यावरणपूरक संकल्पनेचा आधार घेऊन प्रशालेच्या प्रांगणात पालकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.त्यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख हेमंत पाठक यांनी पालकांच्या मदतीने रोपे उपलब्ध करुन दिली.प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका वैशाली भोकरे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमासाठी विद्यमान शालासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे मुख्याध्यापक आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे व मंजुषा शेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले.
09/05/2026
🎉 अभिमानाचा क्षण! 🎉
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
इयत्ता दहावी निकाल 2025-26
💯 99.12% 💯
विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🌸
यशाची उज्ज्वल परंपरा कायम… ✨📚
17/03/2026
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
मंगळवार दिनांक १७ मार्च
"श्रमसंस्कार दिन"
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक
विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर स्मृतिदिन
प्रमुख पाहुणे
श्री.अभय सोरटे
श्री.आनंद कडव
Live soon@ DES's New English School , Ramanbag
28/02/2026
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी
राष्ट्रीय विज्ञान दिन
प्रमुख अतिथी
प्रा.डॉ.सुशील धनमने
(फर्ग्युसन महाविद्यालय)
Live Soon DES's New English School , Ramanbag
27/02/2026
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी
मराठी भाषा गौरव दिन
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिन
प्रमुख पाहुणे
श्री.प्रणव बापट (माजी विद्यार्थी)
Live Soon DES's New English School , Ramanbag
21/02/2026
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी
जनजागृतीपर व्याख्यान
अवयवदान
तज्ञ व्याख्याते
श्री.विवेक ताटके
Live Soon DES's New English School , Ramanbag
14/02/2026
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी
Water Cooler व
E-commerce Website
शालार्पण सोहळा
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.डॉ.श्री.शरद अगरखेडकर
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे
Live Soon DES's New English School , Ramanbag
03/01/2026
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
शनिवार दिनांक 3 जानेवारी
ग्रंथालय अत्याधुनिकीकरण प्रकल्प (माजी विद्यार्थी १९९६)
हस्तांतरण समारंभ
प्रमुख पाहुणे
खासदार डॉ.मेधा कुलकर्णी
कार्यक्रमाचे अध्यक्ष
ॲड.श्री.अशोकराव पलांडे
उपाध्यक्ष, नियामक मंडळ व परिषद
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे
Live Soon DES's New English School , Ramanbag