10/12/2024
Saptasur Music Academy Pvt.Ltd
Saptasur Music Academy Is One Of The Best Music Institute In Pune.
10/12/2024
10/12/2024
A heartfelt thank you to all our incredible sponsors for making Saptasur Sangeet Mahotsav 2024 a grand success! Your support and commitment helped us create an unforgettable musical experience. Together, we’ve made this celebration of music and culture a memorable one. Looking forward to many more successful collaborations! 🎶✨
06/12/2024
🎶✨ A Heartfelt Thank You to Everyone! ✨🎶
Our Annual Function 2024 at Saptasur Music Academy was a huge success, and it’s all thanks to the amazing support of our wonderful audience! 💫 Your energy, passion, and love for music made the event unforgettable. We are truly grateful to have such a talented and dedicated community with us.
Here's to many more musical memories together! 🎵🙌
🎶✨ आपले मनापासून धन्यवाद! ✨🎶
सप्तसुर म्युझिक अॅकॅडमीचा वार्षिक कार्यक्रम 2024 एक मोठा यशस्वी ठरला आणि यासाठी आपल्याला धन्यवाद! 💫 आपल्या उत्साही प्रतिसाद, संगीतासाठी असलेल्या प्रेमामुळे हा कार्यक्रम अजून खास बनला. आम्हाला अशी निःस्वार्थ आणि प्रतिभाशाली समुदाय मिळाल्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत.
संगीताच्या प्रवासात अजून अनेक सुंदर क्षण एकत्र साजरे करूया! 🎵🙌
सप्तसूर म्युझिक अकॅडमी प्रा. लि. प्रस्तुत,
सप्तसूर संगीत महोत्सव व *सप्तसुरचे वार्षिक स्नेहसंमेलन 2024 चे हार्दिक निमंत्रण!
◾ सादरकर्ते ◾
१. सप्तसूर चे २००+ विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन - वादन(तबला,पखवाज, हार्मोनियम , कीबोर्ड, गिटार ) सादरीकरण .
2. श्री .योगेश जैन ह्यांचे शास्त्रीय गायन.
3. श्री . शंतनु गोखले ह्यांचे संतूर वादन .
4. पंडित .सुधाकर चव्हाण सरांचे शास्त्रीय गायन ने महोत्सवाचा शेवट .
तर,चला मग शास्त्रीय संगीताच्या या आनंदयात्रेत सहभागी होऊया! 🎤🎻🥁
दिनांक: १ डिसेंबर २०२४
📍 स्थळ: अण्णाभाऊ साठे सभागृह
🕔 वेळ: सायंकाळी ५:०० ते रात्री १०:००
फ्री पासेस घेऊन येणे अनिवार्य.
फ्री पासेस सप्तसूर मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी :-
८५३००९००५१
९९२३८३४५३३
19/09/2024
"🎶 Exciting News! 🎶
We are thrilled to announce that admissions for Level 02 of Saptasur Music Academy's Online & Offline Riyaz Sessions are now FULL! A heartfelt thank you to all the music lovers who have trusted and supported us. Your passion for music drives us to continue this beautiful journey together. Stay tuned for more updates and future opportunities! 🎤✨"
:
14/09/2024
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांची आज 76 वी जयंती..
वीणा हरी सहस्रबुद्धे यांचा जन्म 14 सप्टेंबर 1948 रोजी उत्तर प्रदेशातल्या कानपूर शहरात झाला.
घरातूनच संगीताचा, ग्वाल्हेर गायकीचा वारसा वीणाताईंना मिळाला.
वडील पं. शंकरराव बोडसांकडून आणि बंधू काशिनाथ बोडसांकडून त्यांना ग्वाल्हेर गायकीची परंपरा प्राप्त झाली. पं. वसंत ठकार, पं. बलवंतराय भट्ट, पं.गजाननबुवा जोशी यांच्याकडूनही त्यांना शिक्षण मिळाले.
लग्नानंतर काही काळ परदेशात वास्तव्य असताना तसे संगीत मागे पडले, तरीही विशेष म्हणजे मायदेशात परत आल्यावर, संगीताचा पुन:प्रवेश आयुष्यात किंचित उशिरा होऊनही त्यांंनी अत्यंत मनस्वीपणे आणि गंभीरपणे गायकी वाढवून, संपन्न अशी कारकीर्द घडविली.
संगीत-अध्यापन, मैफली गायन, वाग्गेयकार (अनेक बंदिशींची निर्मिती), लेखन आणि ध्वनिमुद्रित संगीत या सर्व क्षेत्रांत त्यांचे कार्य विपुल आणि बहुमोल असे आहे.
त्यांनी संस्कृतमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले; परंतु संगीत क्षेत्राची व्यवसाय म्हणून निवड केली.
संगीतात पदव्युत्तर शिक्षण घेऊन, त्यानंतर त्यांनी तराण्यावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली.
त्यांनी अनेक उत्तम तराणे बांधले. मैफलीच्या गायिका म्हणून भारतभर अनेक ठिकाणी त्यांनी मैफली गाजविल्या.
तानसेन समारोह, सवाई गंधर्व अशा महोत्सवांतून तर त्यांचे गायन अनेकदा झाले; परंतु परदेशांतही त्यांनी अनेक मैफली केल्या, गाजविल्या.
'Voices of the World' या कोपनहेगनमधील संगीतोत्सवासाठी त्यांना खास निमंत्रण होते.
वीणा सहस्रबुद्धे यांनी कानपूरला, त्यांच्या वडिलांच्या शंकर संगीत विद्यालयात १९७६ ते १९८५ पर्यंत शिकविले.
त्यांनी १९८५ ते १९९० दरम्यान ना.दा. ठाकरसी विद्यापीठात, पुणे येथे संगीत अध्यापनाचे काम केले.
त्यातील शेवटची दोन वर्षे त्यांनी विभाग प्रमुख म्हणून काम केले.
त्यांनी 1991 मध्ये स्टॉकहोममध्ये झालेल्या कंठसंगीताच्या एका समारोहात चर्चासत्रे घेतली.
पुण्यामध्ये 1990 ते 1997 पर्यंत पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ‘संगीत रसास्वाद’ या विषयावर कार्यशाळा घेतल्या.
जून 2002 ते मे 2004 या काळात त्यांनी मुंबई आय.आय.टी.मध्ये निमंत्रित अध्यापक म्हणून काम केले.
मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्येही त्यांनी अनेक चर्चासत्रे घेतली. ब्रिटनमधील खुल्या विद्यापीठात चित्रफितीद्वारे शिक्षणांतर्गत अभ्यासक्रमासाठी त्यांनी एक सिद्धहस्त कलाकार म्हणून काम पाहिले.
13/09/2024
#अतुल_गोगावले
संगीतकार जोडी अजय-अतुलपैकी
जन्म. ११ सप्टेंबर १९७४ राजगुरुनगर, पुणे
सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे.
या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात ‘विश्वविनायक’ या प्रसिद्ध अल्बमने केली. ‘विश्वविनायक’ या अल्बममध्ये पारंपरिक आरती, स्तोत्रं त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. या वेगळेपणामुळे हा अल्बम जगभर लोकप्रिय झाला. संगीतकार असण्याबरोबरच चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक काँबो म्युझिकल गाणी आणि लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत. त्या गाण्यांना त्यांचा आवाज चपखल आणि साजेसा वाटतो. अजय -अतुल यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांची सारखी बदली होत असे.त्यामुळे अजय व अतुल यांना पश्चिाम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावी राहावे लागे. ग्रामीण संस्कृती, तिथल्या परंपरा, त्याचप्रमाणे तिथल्या भाषेचा ढंग, उच्चारातले बारकावे त्यांना जवळून हेरता आले. लहानपणापासूनच अजय यांना शिक्षणामध्ये विशेष रस नव्हता. पण शालेय जीवनातच संगीताविषयीचा त्यांचा ओढा वाढला. शाळेत असतानाच गाणी-नृत्य बसवणे, बँड पथकात भाग घेणे असे त्यांचे उद्योग चालूच होते. घरात संगीताची पार्श्वचभूमी नसल्यामुळे त्यांना संगीतासाठी घरातून प्रोत्साहन मिळाले नाही. तसेच, वाद्ये विकत घेण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी पुण्याला आल्यावर घराजवळच्या बँडवाल्याशी ओळख करून घेऊन त्यांच्याकडून अनेक वाद्ये शिकून घेतली. पुण्याच्या काही वाद्यवृंदांतून ते कार्यक्रम करू लागले.
अजय अतुल यांनी शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. इलाई राजा यांना ते आपले गुरुस्थानी मानतात. शिक्षणानंतर त्यांनी मुंबईत येऊन टाइम्स म्युझिक च्या विश्वविनायक या संगीत सीडीसाठी काम सुरू केले . यातले श्री गणेशाय धीमही हे शंकर महादेवन यांनी गायलेले गीत खूप गाजले.
जोगवा चित्रपट त्यांच्या आत्तापर्यंत च्या कारकिर्दीतला सर्वांत विशेष चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या उत्कृष्ठ संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच याच चित्रपटातील जीव दंगला या गाण्यासाठी अतुलv यांना पुरस्कार मिळाला आहे .
07/09/2024
सप्तसुर म्यूजिक अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नुकतेच झालेले रियाझ सेशन, ऑनलाइन आणि ऑफलाइन, हे अर्ली मॉर्निंगमध्ये घेतले गेले होते. त्या बदल्यात सहभागी आणि विद्यार्थ्यांकडून खूपच सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या सत्रांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे धन्यवाद! विशेष आभार योगेश जैन सर यांचे, ज्यांनी हे ऑनलाइन आणि ऑफलाइन रियाझ सेशन घेतले.
"Early morning vibes with soulful riyaz sessions at Saptasur Music Academy. Grateful for the enthusiastic participation and the positive feedback from all students. Special thanks to Yogesh Jain Sir for guiding us through this musical journey."
30/08/2024
Day 1 of our singing Riyaj session at Saptasur Music Academy was a huge success! Thanks to Yogesh Jain sir for guiding our students with his expert techniques. All seats were filled, and the energy was incredible both online and offline. Looking forward to many more inspiring sessions ahead!
"Thrilled to present our talented students from SAPTASUR Music Academy performing 'Lakh Lakh Chanderi'! Their dedication and passion for Marathi music shine through every note. 🌟🎶 "
28/07/2024
Saptasur Music Academy Pvt.Ltd दी. २१ जुलै रोजी सप्तसूर चा गुरुपूजन सोहळा २०२४ थाटामाटात पार पडला , ह्या वेळी सप्तसूर च्या Students ने तबला , पखवाज, हार्मोनियम, गिटार, कीबोर्ड , शास्त्रीय गायन , सुगम गायन सादर केले.
Swarsiddhi Music Classes च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अप्रतिम गायन सादर केले
मागील १ महिन्यापासून ची गुरू आणि शिष्यांची मेहनत त्या दिवशी दिसली , अतिशय अभ्यासपूर्वक सादरीकरण करून मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली , त्यानंतर गुरूपूर्जन सोहळा संपन्न झाला, सगळे प्रेक्षक , विदयार्थी गुरुपुजनाच्या वेळी अगदी भारावून गेले होते , Javahar Patil ह्यांनी अगदी अचूक असे क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले , उत्तम असा Rahul Jawalkar ह्यांचा साउंड....उतृष्ट असे Anvay Bendre सरांचे निवेदन , त्यांना साथ मिळाली ती Mahesh Lunkad ह्यांची......!!!
सर्व रसिक मयबाप्पांचे मनापासून धन्यवाद
माझ्या संपूर्ण टीम चे मी मनापासून आभार मानतो ,
Samruddhi Shinde Shivkanya Londhe Sonali Thakare Bhoyar Ranjeet Dixit Vandana Tambolkar Khiste Sachinkumar Wankhede Prakash Korade Shubham bhuruk , shail ukey , Abhay Pote Ganesh Kokil Pandit Pramod Shastri Prabhuraj Mahamuni Nikki Siddhesh Vaishnavi Chawar Sadhana Polkam Vaishali Shah
#सप्तसूर
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
PRERANA HOSPITAL Lane, NEAR AMBAMATA TEMPLE
Pune
411046