Shrutisagar Ashram

Shrutisagar Ashram

Share

Shrutisagar Ashram is an institute of Philosophy of Non-Dualism and Sanskrit The right hand is shown in the center of the circle, which is called Dnyana Mudra.

Meaning of an Emblem of Ashram:

The Vaidic statement “Bramhavidaapnoti Param” means “one who knows the nature of Supreme Bramhan he becomes the Bramhan”. In this Mudra, the index finger bends down to touch the thumb, forming a circle. Middle finger, ring finger and little finger stand together in a straight line, separated from the index finger. These straight fingers indicate three modes of Natu

21/06/2026

कर्म करताना अशा कुशलतेने कर्म करावे की, ज्यामुळे कर्म करूनही मनुष्य कर्मापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहू शकेल. यालाच भगवान गीतेमध्ये ‘योग’ असा शब्द वापरतात. – स्वामीजी

18/06/2026

फक्त मनुष्ययोनीमध्येच अर्थ आणि कामाबरोबरच धर्म आणि मोक्ष हे दोन पुरुषार्थ दिलेले आहेत. धर्म म्हणजेच अत्यंत नियमित, चारित्र्यसंपन्न, सदाचारसंपन्न, नीतिनियमांनी युक्त असणारे जीवन ! – स्वामीजी

16/06/2026

हेतुफलात्मक जीव | Purpose-bearing Being
http://blogs.shrutisagarashram.org/2026/06/purpose-bearing-being.html

---
---
अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो. अशा या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त झालेल्या अज्ञानी जिवालाच हेतुफलात्मक जीव असे म्हटले आहे. कर्तृत्वभावना हा हेतु-कारण असून सुखदुःखे हे त्याचे फळ आहे. जीव या हेतुफळांनी म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध, मर्यादित व संसारी होतो.
---
---

14/06/2026

साधकाच्या मनामध्ये ज्ञानजिज्ञासा उत्पन्न होणे, साधना करण्यासाठी अनुकूल असणारे मनुष्यशरीर प्राप्त होणे, सद्गुरूंची प्राप्ति होणे, शास्त्राचे श्रवण करायला मिळणे ही सर्व त्या भगवंताचीच अनंत व अपार कृपा आहे. – स्वामीजी

12/06/2026

अंतःकरणामधील अशुद्धता नाहीशी करण्यासाठी “निष्काम कर्मयोग” हे साधन आहे. चंचलता नाहीशी करण्यासाठी “उपासना” हे साधन आहे. आणि अज्ञानरूपी आवरण नाहीसे करण्यासाठी “ज्ञान” ही साधना आहे. – स्वामीजी

09/06/2026

अज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Ignorance

http://blogs.shrutisagarashram.org/2026/06/seven-states-of-ignorance.html

---
---
या अज्ञानाच्या सात विशेष अवस्था आहेत. येथे केवळ आणि केवळ दृश्य पदार्थांचा आणि अज्ञानाचा अनुभव येतो. या अज्ञानाच्या भूमिका असून या केवळ चित्ताच्या अवस्था आहेत. या सर्व अज्ञानभूमिका जीवाला भयंकर दुःखे देऊन संसारबद्ध करीत असल्यामुळे या अतिशय निकृष्ट व त्याज्य आहेत. विवेकाच्या व ज्ञानाच्या साहायाने या अज्ञानभूमिकांच्यामधून बाहेर पडता येते. या अवस्थांच्यामधून बाहेर काढणारे आत्मज्ञान हेच अत्यंत श्रेष्ठ, पवित्र व परमकल्याणकारक साधन आहे.
---
---

07/06/2026

ज्ञानयोग व कर्मयोग यामध्ये साध्य-साधनसंबंध आहे. कर्मयोग हे साधन असून ज्ञानयोग हे साध्य आहे. म्हणून ज्ञानाचे फल मोक्ष आहे व कर्मयोगाचेही फळ क्रमाने मोक्षप्राप्तीच आहे. – स्वामीजी

04/06/2026

हजारो जन्मांच्यामधील पापे भस्मसात करण्याचे सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. फक्त हे नाम आवडीने, मनापासून घ्यावयास हवे. – स्वामीजी

02/06/2026

दुःखांनो या ! मी तयार आहे ! | Welcoming The Calamities
http://blogs.shrutisagarashram.org/2026/06/welcoming-calamities.html

---
---
अध्यात्ममार्गामध्ये ३५ किंवा ५० टक्क्यांना उत्तीर्ण होत नाही. ९९.९९ टक्के ही चालत नाहीत. तर १०० टक्क्यांनाच उत्तीर्ण होता येते. सोने जसे मुशीत टाकून तावून - सुलाखून घेतल्यावरच ते तेजस्वी, ओजस्वी होते. त्याचप्रमाणे साधकाने आपले मन सर्व प्रसंगांच्यामधून तयार केले पाहिजे.
---
---

31/05/2026

'सेवा' हा मनाचा असा एक भाव आहे की, सेवा करीत असतानाच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो. ज्याला आपण अर्पण करतो त्याच्यावर नितांत श्रद्धा, भक्ति, प्रेम असेल तरच सेवाभाव निर्माण होतो. – स्वामीजी

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Shrutisagar Ashram, Phulgaon
Pune
412216