PDEA's Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar
Re-Accreditaited by NAAC at A+ grade in 2024. Recipient of the Best College Award by SPPU, Pune in 2013.
This is Multi-Faculty College known for excellent teaching, modern facilities, and an overall healthy academic atmosphere.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट (एनबीटी) आयोजित पुणे पुस्तक महोत्सव अंतर्गत फिरते ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.
18/07/2025
18/07/2025
"पुणे ते बारामती" राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा - Tip Top 24 news पुणे, - पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद....
17/07/2025
मगर महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यशाळा
लोकसंख्या व लोकसंख्येचे अनेक पैलू, त्याचे होणारे परिणाम याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने लोकसंख्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व ज्ञानविस्तार विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये लोकसंख्येचे विविध पैलू, त्याचे परिणाम याविषयी चर्चा आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ शुभांगी औटी, भूगोल विभाग प्रमुख डॉ सविता कुलकर्णी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ अशोक ससाणे, डॉ. गणेश गांधिले, डॉ.प्रविण पोतदार, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग समन्वयक प्रा. संगिता देवकर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. संगिता देवकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लोकसंख्या या घटकाचा अनेक लहान गोष्टींशी संबंध असून याचा विचार व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
यानंतर लोकसंख्या या विषयावर विवेचन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी लोकसंख्या वाढीची आकडेवारी सांगून येत्या काळात भारताची लोकसंख्या वृध्द होणार आहे. आज भारत सगळ्यात तरूण देश असून तरुणांनी यांचा जरूर विचार केला पाहिजे असे सांगितले. यानंतर डॉ. अशोक ससाणे यांनी लोकसंख्येची आकडेवारी सांगून वाढती लोकसंख्या देशाच्या विकासाला कशी मारक असते आणि काही देशांमध्ये कमी लोकसंख्या हा मोठा प्रश्न असतो. न्यूनतम, पर्याप्त, अतिरिक्त असे लोकसंख्येचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे दिली. डॉ. सविता कुलकर्णी यांनी लोकसंख्येचे विविध पैलू सांगून यामध्ये जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर, साक्षरता, अवलंबन भार, लिंगरचना याचा समावेश होत असल्याचे सांगितले. या सर्व पैलूंवर प्रकाश टाकल्यास लोकसंख्येचे परिणाम कुठे व कसे होतात याची माहिती आपल्याला कळते. जगाचा विचार केल्यास सर्व ठिकाणी लोकसंख्या हा प्रश्न नसतो. भारताचा विचार करता लोकसंख्येची गुणवत्ता वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.हडॉक्टर गणेश गांधिले यांनी लोकसंख्या हा विषय सामाजिक शास्त्रांमध्ये अभ्यासला जात असून अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र या विषयांशी अत्यंत जवळचा संबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना लोकसंख्येविषयीची फिल्म दाखवून त्यावर त्यांचा फीडबॅक घेण्यात आला. भूगोल विभागाच्या वतीने लोकसंख्या या विषयावर सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण पोतदार यांनी तर सूत्रसंचालन गणेश गांधिले यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन सविता कुलकर्णी डॉ. गणेश गांधिले, डॉ. अशोक ससाणे यांनी उपस्थित शिक्षक सहकारी यांच्या सहकार्याने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचा मार्गदर्शनाखाली गेले.
17/07/2025
गुरुपौर्णिमेनिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सुरक्षारक्षक व आदरातिथ्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
हडपसर, पुणे: अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. महाविद्यालयातील सुरक्षारक्षक व आदरातिथ्य विभागातील कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती देवीच्या पूजनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितिन घोरपडे , उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे,विभागप्रमुख डॉ. विलास वणी यांनी उपस्थितांचे स्वागत करताना गुरुपौर्णिमेचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी सांगितले की, “गुरु म्हणजे केवळ शिकवणारे शिक्षकच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे प्रत्येक व्यक्ती गुरुच असतात. आपल्या महाविद्यालयातील सुरक्षारक्षक व आदरातिथ्य कर्मचारी हेही आपल्या सुरक्षेचे व व्यवस्थापनाचे गुरुच आहेत.”
विद्यार्थ्यांनी या कर्मचाऱ्यांना फुलांचा गुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे आणि योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन कॉम्पुटर सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांनी केले होते.
कार्यक्रमात सायबर सुरक्षेवरील परिसंवादात विद्यार्थ्यांनी QUICK HEAL FOUNDATION या योजेअंतर्गत "सायबर शिक्षा सायबर सुरक्षा" या उपक्रमाद्वारे सायबर सेक्युरीटी बद्दल माहिती दिली. या माध्यमातून कर्मचाऱ्यांना ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित पासवर्ड्स, OTP फसवणूक, सोशल मीडियावरील सावधगिरी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
17/07/2025
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात वाणिज्य व संशोधन केंद्र विभागाअंतर्गत उद्बोधन कार्यक्रम संपन्न
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला . उद्बोधन कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची माहिती, विषयाची माहिती, शिक्षकांची ओळख, विविध उपक्रमांची माहिती देणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी झाली. तबला वादन - प्रणव औताडे शास्त्रीय संगीत - स्वानंदी, वेस्टर्न नृत्य - केतकी जाधव व तेजस्विनी उगाडे, लावणी - समीक्षा काळे व सायली दिघे यांनी सादरीकरण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, यूजीसी, नॅक, महाविद्यालयाची स्थापना व्हिजन – मिशन, महाविद्यालयाला मिळालेले पुरस्कार – सन्मान, कोर्सेस, यासंबंधी सर्व माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातून दिली. तसेच, विषयांची माहिती, विविध उपक्रम, एनएसएस, एनसीसी, आविष्कार स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, ग्रंथालय, स्पोर्ट्स, हॉस्टेल, प्लेसमेंट ड्राईव्ह, स्पर्धा परीक्षा केंद्र, ग्रीन कॅम्पस अशा सर्व उपक्रमांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोज ४५ मिनिटं व्यायाम करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉ. शुभांगी औटी, प्रा. गंगाधर सातव, ग्रंथपाल प्रा. दत्तात्रय संकपाळ, डॉ. अजिनाथ डोके, डॉ. सुनील वाघमोडे, प्रा.प्रतीक कामठे, प्रा. गौरव शेलार, प्रा. तेजश्री कोकरे या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नीता कांबळे यांनी केले तर प्रा. डॉ. गंगाधर सातव यांनी आभार मानले.
17/07/2025
महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी समारंभ संपन्न
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णा साहेब मगर महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त करिअर ससंदेतील पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी पदाधिकाऱ्यांना मागदर्शन केले.
मुख्यमंत्री ऋषिकेश दिलीप सुतार ,नियोजन मंत्री तेजस संभाजी गायकवाड ,कायदे व शिस्त पालन मंत्री ओमकार शिवले , सामान्य प्रशासन मंत्री आयशा शर्मा,
माहिती व प्रसारण मंत्री अक्षय स्वामी,उद्यायोजकता विकास मंत्री राहिल शेख,रोजगार व स्वयंरोजगार मंत्री शिवम जाधव , कौशल्य विकास मंत्री शितल कुऱ्हाडे ,
संसदीय कामकाज मंत्री हेमंत विश्वासे , महिला व बालकल्याण प्राची अमराळे या विद्यार्थ्यांची मंत्री पदाची शपथ घेतली. करिअर कट्टा या उपक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रुची व सहभाग वाढावा तसेच त्यांच्या करिअर विषयी दृष्टीकोना मध्ये जास्तीत जास्त स्पष्टता यावी या उद्देशाने करिअर संसदेची स्थापना केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य वाढीस लागावे तसेच महाविद्यालयात उपलब्ध होत असलेल्या रोजगार व नोकरीच्या संधी , स्पधी परिक्षा मार्गदर्शन तसेच करिअर कट्ट्या अंतर्गत घेत असलेल्या विविध कोर्सची व प्रशिक्षणाची माहिती महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यां पर्यंत पोहचावी या उद्देशाने करिअर संसद कार्यरत असते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सदस्य व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करून भावी वाटचालीसाठी नूतन विद्यार्थी मंत्री मंडळास शुभेच्छा देऊन मंत्री मंडळाचे अभिनंदन केले . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे, डॉ शुभांगी औटी, डॉ गंगाधर सातव,प्रा.अनिल जगताप करिअर कट्टा समन्वयक डॉ.निता कांबळे करिअर कट्टा समिती सदस्य डॉ सुनिल वाघमोडे प्राआशा माने,प्रा. महेश्वरी जाधव प्रा.उर्मिला धनगर प्रा.दिपाली माळी , डॉ शीतल जगताप व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्तविक करिअर कट्टा समन्वय डॉ.निता कांबळे यांनी केले आभार प्रा. आशा माने यांनी मानले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा दिपाली माळी यांनी केले
17/07/2025
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अभिनय कार्यशाळेचे आयोजन
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत अभिनेत्री अनुष्का देशमुख आणि अभिनेते पवन पोटे यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अशोक ससाणे यांनी केले.
अभिनयासाठी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास हवा असतो. अभिनयात सहजता आवश्यक असते. नाटकात एखाद्या पात्राच्या भूमिकेचे अनुकरण करतो. कला माणसाला आयुष्यभरासाठी आनंद देते. असे मत अनुष्का देशमुख यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देता यावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडत असतो. आपल्यातील सुप्त कलागुणांना व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी मिळत असते. अभिनय हे असे कला क्षेत्र आहे अनेक लोकांनी स्वतःचा व्यवसाय सोडून अभिनयात करिअर केले आहे. त्यामुळे अभिनयाकडे करिअर म्हणून बघा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी डॉ. रमाकांत जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोलकर, डॉ. प्रा. काशिनाथ दिवटे, डॉ. दत्तात्रय टिळेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना जाधव यांनी केले तर आभार डॉ. अनिल लोंढे यांनी मानले.
17/07/2025
सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी आण्णासाहेब मगर महाविद्यालयाने कृष्णाजी खंडुजी घुले विद्यालय,मांजरी बु.येथे दिली भेट.....
पुणे –
Quick Heal Foundation अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या "Cyber Shiksha for Cyber Suraksha" या उपक्रमाच्या माध्यमातून आण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या Cyber Warriors टीमने कृष्णाजी खंडुजी घुले, मांजरी बु. येथे भेट देत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे, सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व पटवून देणे आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सजगता निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स शाखेचे विद्यार्थी Cyber Warriors म्हणून सहभागी झाले होते. तेजस दळवी, मृणाल दाणेज, आश्लेषा दामगुडे, प्रणाली शिंदे,यश भराटे, प्रणव तळेकर, समीक्षा गायकवाड, अंकिता हरपळे, नेहा विश्वासे, अपूर्वा वाळके व अहन दगडे हे स्वयंसेवक Quick Heal Foundationच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित असून त्यांनी पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे विविध पैलू अत्यंत प्रभावी पद्धतीने समजावून सांगितले. सोशल मीडिया वापरातील धोके, गोपनीयता राखण्याचे उपाय, फिशिंग, OTP फसवणूक, बनावट लिंक, पासवर्ड सुरक्षेचे महत्त्व यावर संवादात्मक सत्राद्वारे माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी ही यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला, त्यांचे सायबर गुन्ह्यांवर विविध अनुभव सांगितले, सायबर सुरक्षेच्या संबंधित विविध प्रश्न विचारले आणि सायबर सुरक्षेची शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी सादर केलेले सायबर शिक्षण.....
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सादरीकरण कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना विकसित झाली. तसेच, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महाविद्यालयातील अनेक मान्यवरांचा मोलाचा सहभाग होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. विलास वाणी, प्रा. अनिल जगताप आणि प्रा. मनिषा गाडेकर यांनी Cyber Warriors टीमला मार्गदर्शन करत सायबर सुरक्षेच्या गरजेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता वाढत असून, ते आता अधिक सुरक्षित आणि जबाबदार नागरिक बनत आहेत.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत असे उपक्रम नियमितपणे राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
शाळेचे मुख्याध्यापक – श्री.निगडे आर. डी,उपमुख्याध्यापक श्री. शेलार बी. के, पर्यवेक्षक सौ. सोनवणे एन. एन, उपशिक्षक सौ. ताकवले एस. आर आणि उपशिक्षक श्री. मेमाणे डी. व्ही या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होत असल्याचे सांगितले.
ह्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे Cyber Warriors टीमने अत्यंत प्रभावी सादरीकरण केले आणि शाळेतील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.ह्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे Cyber Warriors टीमने अत्यंत प्रभावी सादरीकरण केले आणि शाळेतील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
Quick Heal Foundationच्या CSR उपक्रमांतर्गत अशा कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये करण्यात येत असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सुरक्षिततेचे भान देणारा ठरला असून, शाळा स्तरावर सायबर शिक्षणाची पायाभरणी होत आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Address
Survey No. 215 277 Manjari Road, Hadapsar
Pune
411028
Opening Hours
| Monday | 10am - 5pm |
| Tuesday | 10am - 5pm |
| Wednesday | 10am - 5pm |
| Thursday | 10am - 5pm |
| Friday | 10am - 5pm |
| Saturday | 10am - 5pm |